Home आरोग्य रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रकोप; दोन रूग्ण पॉझिटीव्ह

रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रकोप; दोन रूग्ण पॉझिटीव्ह

0
42

रावेर प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले असून हे दोन्ही रूग्ण रावेर तालुक्यातील असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

आज रात्री उशीरा जिल्हा माहिती कार्यालयाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यात म्हटले आहे की, जळगाव मुक्ताईनगर, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या 25 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

यापैकी 23 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 2 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही व्यक्ती रावेर येथील आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 492 इतकी झाली आहे.


Protected Content

Play sound