Home क्राईम भुसावळात किराणा दुकानदारावर प्राणघातक हल्ल्या करणारे चौघे अटकेत

भुसावळात किराणा दुकानदारावर प्राणघातक हल्ल्या करणारे चौघे अटकेत


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील दिनदयाल नगरातील किरणा दुकानदारावर प्राणघातक हल्ला करणारे चार संशयित आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली आहे. आज चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील दिनदयाल नगर भागातील गुरूदेव प्रोव्हीजन स्टोअर्स दुकानाचे मालक राजकुमार गोविंदराम आगीचा (वय-६७) रा. सुनिल आईल मिलजवळ हे दुकानावर असतांना संशयित आरोपी तस्लीम ऊर्फ ( काल्या ) सलीम शेख (वय-२६), कलीम सलीम शेख (वय-२८), सलमान खान अयुब खान ऊर्फ ( धिरज) (वय-१९) आणि ताराबाई सलीम शेख (वय-५२) हे दुकानावर येवून ५ हजार रूपयाचा किराणा उधार मागीतला. त्यावर कालच तुम्ही किराणा उधार घेवून गेले त्याचेचे पैसे दिले नाही आणि आज परत कसकाय देवू असे दुकानादाराने सांगितले असता याचा राग चारही जणांना आल्याने दुकाना घुसून मालक राजकुमार आगीचा याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात संशयित आरोपी तस्लीम शेख याने कमरेतील चाकू काढून डोक्यावर वार केला. यात दुकानदार गंभीर जखमी झाला होता. तर दुकानातून ८ ते ९ हजार रूपये रोख चोरून फरार झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी तस्लीम ऊर्फ ( काल्या ) सलीम शेख (वय-२६), कलीम सलीम शेख (वय-२८), सलमान खान अयुब खान ऊर्फ ( धिरज) (वय-१९) आणि ताराबाई सलीम शेख (वय-५२) यांना २३ मे रोजी शहरातील नाहाटा चौफुली जवळी पाण्याच्या टाकी जवळून अटक केली. या कारवाईत सपोनि अनिल मोरे, सपोनि संदिप परदेशी, पो.हे.कॉ आयाज सैयद, पो.ना. रविंद्र बिऱ्‍हाडे, रमम सुरळकर, महेश चौधरी, समाधान पाटील, तुषार पाटील, उमाकांत पाटील, पो.कॉ.कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, बंटी कापडणे यांचा सहभाग होता. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहे.

दोन्ही संशयित आरोपी हिस्ट्रीशीटर
संशयित आरोपी तस्लीम ऊर्फ काल्या सलीम शेख, कलीम सलीम शेख यांच्या विरोधात मर्डर, हाफ मर्डर, चोरी, जबरी चोरी, खंडणी प्रकरणी वेगवेगळ्या गुन्ह्यात यापुर्वी गुन्हा दाखल आहे.


Protected Content

Play sound