भाजप खासदाराच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यालाच बेदम मारहाण

औरंगाबाद (वृत्तसंस्था) भाजपच्या खासदार पुत्रांनी एका भाजप कार्यकर्त्याला घरात घुसून बेदम मारहाण केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी भाजप युवा मोर्चाचा सदस्य कुणाल मराठे या तरुणाला बेदम मारहाण केली.

 

तू वार्डमध्ये फिरायचे नाही. कारण आगामी महानगर पालिका निवडणुकीत मला तिकीट मिळणार आहे. लोकांनाही मदत करत जाऊ नकोस, असा दम देत तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्यासह माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला या तिघांपासून धोका असल्याचे कुणाल मराठे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओत काही तरुण कुणाल मराठेला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. ही घटना काल (23 मे) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

Protected Content