दिलासादायक : धरणगावातील सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या ९ जणांपैकी ६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी दिली आहे. दरम्यान, ६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धरणगावकरांना दिलासा मिळाला आहे.

 

 

आजरोजी धरणगावातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दहावर आहे. यातील एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लहान माळीवाडा परिसरातील दोन जणांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी स्वत:हून स्वॅब सँपल देऊन तपासणी केली होती. यातील एक जण पॉझिटीव्ह आला असून एकाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. संबंधीत पॉझिटीव्ह रूग्ण हा देखील लहान माळीवाडा परिसरातील रहिवासी असून त्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांना रात्रीच क्वॉरंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, शहरातील खत्री गल्ली परिसरातील  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या ९ जणांपैकी ६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे धरणगावकरांनी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कारण अद्यापही ३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केली आहे.

Protected Content