corona spread
आरोग्य, भुसावळ

भुसावळात कोरोनाचा हाहाकार : पुन्हा नवीन २१ बाधीत रूग्ण

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील तब्बल अडीचशे संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने भुसावळकर निर्धास्त झाले असतांना रात्री आलेल्या अहवालात तालुक्यातील २१ रूग्ण बाधीत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

kirana

भुसावळ शहरात आधी एक पॉझिटीव्ह रूग्ण आला. यानंतर पाच रूग्ण बाधीत असल्याची माहिती समोर आली. तर रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल २१ जण कोरोनाने बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे बहुतांश जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असले तरी तालुक्यावरील कोरोनाचे संकट अजून टळले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.