रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा सीम येथे ५८ वर्षीय प्रौढाचा अकस्मात मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य अधिकारी यांनी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
याबाबत महिती अशी की, तालुक्यातील निंभोरा सीम येथील ५८ वर्षीय व्यक्ती हे शुक्रवारी शेतात दिवसभर काम केले. रात्री अचानकपणे ताप आल्याने तब्बेत बिघडली. त्यांना प्राथमोपचारासाठी मुक्ताईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान आरोग्य अधिकारी यांनी खबरदारी म्हणून मयताचे स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.