गिरणा टाकी परिसरात सट्ट्याच्या जुगार अड्ड्यावर कारवाई; दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगर परिसरातील गिरणा टाकीजवळ बेकायदेशीर मिलन मटका खेळणाऱ्या दोन जणांवर आज दुपारी करवाई केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील गिरणा पाण्याच्या टाकीजवळ रामांनद नगर भागात योगेश समाधान न्हावी हा अवैधरित्या मिलन मटका खेळत असल्याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यानुसार सपोनि राजेश शिंदे, स.फौ. गोपाल चौधरी, पो.ना. रविंद्र पाटील, पो.कॉ. प्रविण वाघ, विश्वनाथ गायकवाड यांनी दुपारी २ वाजेच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी योगेश समाधान न्हावी (वय-२१) आणि शंकर भोसले (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. शिवाजी नगर यांना रंगेहात पकडले.

दोघांच्या ताब्यातून ६४० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोना विश्वनाथय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content