parola
पारोळा, सामाजिक

मजुरांना वेल्हाणे सरपंच व पोलिस पाटलांचा मदतीचा हात

शेअर करा !

पारोळा, प्रतिनिधी । भडगाव येथील ४२ मजुर पनवेल येथे कामाला गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना गाडीवाल्याने वेल्हाणे चेक पोस्ट जवळ सोडुन दिले. त्यांच्या सोबत लहान लहान मुले होती.  वेल्हाणे खुर्द येथील सरपंच, पोलीस पाटील यांनी मदत करून त्यांना घरी सोडण्याची व्यवस्था केली.

kirana

कोरोना विषाणूचा संसर्गात आज पनवेलहुन भडगावकडे मजूर आपल्या कुटुंबियांसोबत येत असतांना त्यांना गाडीवाल्याने वेल्हाणे चेक पोस्ट जवळ सोडुन दिले. याबाबत वेल्हाणे खुर्द येथील सरपंच, पोलीस पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चेक पोस्टला भेट दिली. या भेटीत त्यांना मजुरांना खायाला, पियाला काहीही नाही असे चित्र त्यावेळी त्यांना दिसले. यावेळी वेल्हाणे येथील सरपंच ज्ञानेश्वर पाटील व पोलीस पाटील हिम्मत गायकवाड यांनी त्यांना जेवण दिले. व त्या मजुरांना वेल्हाणे येथुन गाडी करुन सुखरुप पणे भडगाव येथे पाठवले.त्या मजुरांनी वेल्हाणेचे सरपंच, पोलीस पाटील व वेल्हाणे ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी शेनफडु पाटील, अभिषेक ज्ञानेश्वर पाटील, अर्जुन चित्ते, राजु मोरे, भैय्या मोरे, रविंद्र गायकवाड, अनिल सोनवणे, राजु सोनवणे, अण्णा मोरे, राकेश पाटील आदी ग्रामस्थ होते.