Home Cities जळगाव कंजरवाडा परिसरात गावठी हातभट्टीवर धाड; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

कंजरवाडा परिसरात गावठी हातभट्टीवर धाड; एमआयडीसी पोलिसांची कारवाई


जळगाव प्रतिनिधी । शहरातील कंजरवाडा, सिंगापूर परिसरात बेकायदेशील गावठी हातभट्टीवर पोलीसांनी धाड टाकून ९० हजार रूपयांची दारू व दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कंजरवाडा परिसरातील सिंगापूर येथे बेकायदेशीर दोन महिला गावठी हातभट्टी लावून दारू तयार करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने बुधवारी सायंकाळी सिंगापूर परिसरात धाड टाकून सुमारे ९० हजार रूपयांची दारू व रसायन साहित्य जप्त केले आहे. दरम्यान याप्रकरणी दोन महिलांवर बेकायदेशीर दारू तयार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दीपक चौधरी, इम्रान सय्यद, भूषण सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Protected Content

Play sound