नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतू 1 जूनपासून 200 प्रवासी ट्रेन सुरु होणार आहे. यासाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून तिकीटाच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे.
परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सुरु करण्यात आल्या आहे. मात्र, आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या धावणार आहेत. या रेल्वे सेवेत जनशताब्दी ट्रेन, संपर्क क्रांती, दुरांतो एक्स्प्रेस आणि इतर नियमित प्रवासी ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये अनारक्षित डबे नसतील. या गाड्या नव्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत. या गाड्यांच्या बुकींगला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. परंतू त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ तिकीटाची सुविधा नसेल. प्रवाशांची पहिली यादी ट्रेन सुरु होण्याच्या चार तास आधी आणि दुसरी यादी ट्रेन सुरु होण्याच्या दोन तास आधी तयार होईल. स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाईल. कोरोनाची लक्षणं नसलेल्या प्रवाशांनाच स्टेशन आणि ट्रेनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी असेल.