fire
क्राईम, राज्य

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर इंधनाच्या टँकरचा स्फोट ; ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू

शेअर करा !

बीड (वृत्तसंस्था) सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी इंधनाच्या टँकरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण अपघातात ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

kirana

 

बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाटात बुधवारी आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास इंधनाचा एक टँकर अचानक पलटी झाला. टँकर पलटी होताच त्याने पेट घेतला. त्यामुळे इंधनाचा स्फोट झाला आणि त्यात ड्रायव्हरचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर भाजला गेला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पडलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्र मिळवले. दरम्यान, या अपघातामुळे काहीकाळ वाहतूक थांबवण्यात आली होती.