चाळीसगाव तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संपर्कातील १३ जणांना केले क्वारंटाईन

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील कोरोना बाधितांशी संपर्कात आलेल्या १३ संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यात तळेगाव येथील ४, बहाळ येथील ४, पोलीस कर्मचारी ४ आणि घाटरोडवरील एकाच समावेश असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. बी.पी.बाविस्कर यांनी दिली.

सदरील वृध्द हे मालेगाव येथून आले होते. त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने वृध्दाच्या नातेवाईकांना त्यांना तपासणीसाठी चाळीसगाव न आणता औरंगाबाद येथे नेण्यात आले. औरंगाबाद येथील डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतले. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान त्याचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान, वृध्दाच्या संपर्कातील चार नातेवाईकांना चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात क्वारंटाईन केले आहे. भडगाव येथील कोरोनाबाधित वृद्धाच्या अंत्ययात्रेत गेलेले बहाळ येथील ४ तसेच एक महामार्ग पोलिस पाॅझिटिव्ह आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेले ४ महामार्ग पोलिस आणि शहरातील घाटरोड येथील १ मुंबई पोलिस कर्मचारी असे एकुण १३ जणांना क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅब घेऊन धुळे येथे तपासणीस पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक बी.पी.बाविस्कर यांनी सांगितले.

दरम्यान, रात्री उशिरा तालुक्यातील जामडी येथील संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता, परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गांनी तालुक्यात संशयितांचा शिरकाव होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यासाठी तालुक्यातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी डोळ्यांत तेल घालुन लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.

Protected Content