चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा व राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वेबीनार उत्साहात पार पडले.
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा व राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अपॉर्च्युनिटीज इन बँकींग सेक्टर अँड प्लेसमेंट असिस्टंट या विषयावर विद्यार्थ्यांना बँकींग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने एकदिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन वेबिनारचेफ आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, डॉ.अलोक मल्होत्रा, निरंजन मोहिते, वेबिनार समन्वयक डॉ.के.डी.गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते. या राष्ट्रीय वेबिनार आयोजनासंदर्भात महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या राष्ट्रीय वेबिनारप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात त्यातल्या त्यात लॉकडाऊन च्या काळात युवकांना घरबसल्या बँक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या अनेक संधी तसेच या वेबिनारच्या माध्यमातून युवकांना लॉकडाऊनच्या काळात सकारात्मक गोष्टींची ओळख करून देणे याविषयी माहिती करून देणे ही महत्वपूर्ण बाब आहे.विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून बँकिंग क्षेत्रातील संधी या विषयाची ओळख करून देणे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने कौतुकास्पद गोष्ट आहे. यावेळी डॉ.अलोक मल्होत्रा व निरंजन मोहिते यांनी विद्यार्थ्यांना अॅपच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना असलेल्या संधींची साध्या सोप्या भाषेत ओळख करून दिली. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या राष्ट्रीय वेबिनारप्रसंगी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांचे आभार डॉ.के.डी.गायकवाड यांनी मानले. लॉकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी बँकिंग क्षेत्रातील संधी या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करणारे कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पहिले महाविद्यालय आहे.