नागरिकांनो सावधगिरी बाळगा- प्रांताधिकार्‍यांचे आवाहन

एरंडोल प्रतिनिधी । धरणगावातील एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण एरंडोल येथील रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरवासियांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव येथील लहान माळीवाडा परिसरातील ३५ वर्षीय पॉझिटीव्ह महिलेने मागील काही दिवसात एरंडोलला एका दवाखान्यात उपचार घेतला होता.हे प्रशासनाच्या निदर्शनात आल्यावर ते हॉस्पिटल आज सील केले गेले असून त्या हॉस्पिटलच्या संपर्कातील ५ व्यक्तीचे नमुने उद्या धुळे तपासणीला जाणार असुन या हॉस्पिटलशी अप्रत्यक्ष संबंधीत ४३ लोक होम क्वॉरंटाईन केले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोलकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रांताधिकारी म्हणाले की, पॉझिटीव्ह महिलेचा एरंडोल येथील रूग्णालयात संपर्क आल्याने आपल्याला काळजी घेणे महत्वाचे आहे.घराबाहेर अत्यंत तातडीचे काम असेल तरच बाहेर पडा, मास्क वापरा, कोणाशीही संपर्क करताना सोसिएल डिस्टन्स ठेवा, कुठेही गर्दी करू नका,रस्त्यावर थुंकू नका, कुठेही स्पर्श झाला तर चेहर्‍याला हात लावण्यापूर्वी साबण/सॅनिटाईझर ने धुवा. लहान मुले,वृद्ध,मधुमेह असे आजार असणार्‍यांना घराबाहेर पडू देऊ नका आणि बाहेरून आल्यावर अंघोळ केल्या शिवाय त्यांचा संपर्क होऊ देऊ नका.शक्यतो घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे.

Protected Content