औरंगाबाद वृत्तसंस्था । औरंगाबाद जिल्ह्यात ५९ नवे ‘कोरोनाग्रस्त’ रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या एक हजाराच्या पार गेली आहे. औरंगाबादमध्ये एकूण १०२१ ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य प्रशासनाने चितेंचे वातावरण तयार झाले आहे.
औरंगाबाद शहरात आज सकाळी ८ वाजेपर्यंत ५९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १०२१ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले. यामध्ये २७ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.
औरंगाबादमध्ये १५ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. या रुग्णानंतर कोरोनाबाधितांचा आकड्यात काहीशी वाढ होत होती. मात्र गेल्या २० दिवसात हा आकडा प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याचे मोठं आवाहन प्रशासनापुढे आहे.