Home राष्ट्रीय पुलवामाचा बदला : दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले

पुलवामाचा बदला : दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले

0
19

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय वायुदलाने आज पहाटे थेट पाकच्या हद्दीत शिरून केलेल्या कारवाईमध्ये दोनशेपेक्षा दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय हवाई दलाने आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाकव्याप्त काश्मिरमध्ये हवाई हल्ला करून दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार हल्ला केला. १२ मिराज फायटरचा ताफा आज पहाटे पाकच्या हद्दीत शिरला. या विमानांनी जैश ए मोहंमद या दहशतवादी संस्थेच्या प्रशिक्षण स्थळांवर हल्ले करण्यात आले. यात जैशसह हिज्बुल मुजाहिदीन व लष्कर ए तोयबाच्या काही तळांचाही समावेश आहे. भारताच्या या कारवाईमध्ये तब्बल दोनशेपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound