उत्तर प्रदेशात भीषण अपघात ; २४ मजुरांचा मृत्यू

औरैया (उत्तर प्रदेश) स्थलांतर  करणाऱ्या  मजुरांना घेऊन भरधाव निघालेल्या ट्रकला आज पहाटे समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २४  मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर २२ मजूर जखमी झाले आहेत.

 

आज पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हे मजूर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील होते. सर्व जखमी रुग्णांवर उपचार सुरू असून जखमींपैकी १५ मजूर गंभीर आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. अपघातातील पीडितांना सर्वतोपपरी मदत देण्यात यावी, तसेच जखमींवर योग्य उपचार करावेत असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

Protected Content