जळगाव प्रतिनिधी । जुन्या गाव परिसरातील मारूती पेठ, जोशी पेठ, भावसार मढी, बागवान गल्ली हा भाग कोरोनाचा रूग्ण आढळून आल्याने तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केले. त्या परिसरातील काही नागरिकांसाठी स्वतंत्ररित्या महानगरपालिकेतर्फे ‘मोबाईल टॉईलेट’ची व्यवस्था करण्यात आली आहे.
मारूती पेठ, जोशी पेठ, भावसार मढी, बागवान गल्ली या परिसरात एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. आधीच्या जुन्या शौचलयात गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे असे पालिका आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता नागरीकांची शौचालयात गर्दी होत नाही. कोरोना या आजारामुळे तसेच नागरिकांचे आरोग्याला बाधा पोहचू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. खबरदारी म्हणून नगरपालिका प्रशासन कार्य करीत असून नगरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या परिसरातील वार्डाचे नगरसेवक विद्यमान महापौर भारती सोनवणे, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, चेतन संकत आणि नगरसेविका चेतना किशोर चौधरी ह्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते लक्ष ठेवून आहेत.