Home धर्म-समाज भुसावळातील शांती नगर परिसरात वीजपुरवठा खंडीत; नागरिक हैराण !

भुसावळातील शांती नगर परिसरात वीजपुरवठा खंडीत; नागरिक हैराण !


भुसावळ प्रतिनिधी । येथील शांती नगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिसराला सील करण्यात आलेला आहे. अशा भागात राहणारे नागरिक आधीच त्रस्त झालेले असतांना वीजपुरवठा खंडीत झाल्याने हैराण झाले आहे.

अधिक माहिती अशी की, शहराचे उन्हाचे तापमान ४५ डिग्रीवर पोहचले असून शांती नगर भागाला कोरोना रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने २७ तासापासून शांती नगर भागातील वीज पुरवठा खंडीत करून त्या भागातील नागरिकांना त्रास तर देत नसावे.असे प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरात-लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यात येण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound