रावेर प्रतिनिधी । येथे तालुका कृषी विभाग रावेर तर्फे स्वानंद कृषी विज्ञान मंडळाच्या सहकार्याने शेतकर्यांना बांधावर खताचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांच्या आवाहनानुसार रावेर तालुका कृषी अधिकारी एस आर साळुंके यांच्या मार्गदर्शनानुसार खतांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी विभागातर्फे मंडळ कृषिअधिकारी मयूर भामरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. सोबत यावेळी कृषी पर्यवेक्षक एन व्ही रूले, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सी टी माळी,यांसह स्वानंद कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष गिरीश नेहेते, उपाध्यक्ष सुधीर मोरे, सचिव गुणवंत भंगाळे, राजीव भोगे, विवेक बोंडे,मिलिंद बोंडे,योगेश कोळंबे, महेश भंगाळे, यांसह रावेर अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.