Home क्राईम जळगावातील ख्वॉजामियॉ दर्ग्यातून दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यास अटक

जळगावातील ख्वॉजामियॉ दर्ग्यातून दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यास अटक

0
43


जळगाव प्रतिनिधी । शहरातील ख्वॉजामियॉ दर्गातून दानपेटी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली असून त्याच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील गणेश कॉलनी परिसरात ख्वॉजामियॉ यांचा दर्गा आहे. या दर्ग्यातून दानपेटी लांबविल्याची घटना मंगळवारी ५ मे रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत ते तपासले असता एक संशयीत दर्गापरिसरात वावरत असल्याचे दिसून आले. त्यानुसार तपासाला गती दिली. पिंप्राळा परिसरातून दिनेश ताराचंद चव्हाण (२६) याला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देत दानपेटी काढून दिली. गुरूवारी संशयीत तरूणाला यालयात हजर केले असता युक्तीवादाअंती त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Protected Content

Play sound