Home क्राईम तरूणांच्या भांडणात महिलेला मारहाण; एकावर गुन्हा

तरूणांच्या भांडणात महिलेला मारहाण; एकावर गुन्हा

0
169
crime-2


जळगाव प्रतिनिधी । दोन तरूणांच्या भांडणावरून एकाने दुसऱ्या तरूणाच्या घरी जावून मुलाच्या आईला शिवीगाळ करून डोक्यात काठी मारून गंभीर जखमी केल्याची घटना शंकरराव नगरात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात तरूणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, धनाजी नाना महाविद्यालय परिसरातील शंकरराव नगर येथे कल्पना कोळी या पती भागवत कोळी, मुलगा संदीप, शेखर, चेतन व सुन योगीता व शितल यांच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. पती भागवत हे सेंटींग काम करतात. 6 रोजी दुपारी 2 वाजता कल्पना कोळी यांचा मुलगा चेतन कोळी याचे दिनकर नगर येथील राहूल सुधाकर सपकाळे रा. दिनकर नगर याच्याशी काहीतरी कारणावरुन भांडण झाले होते. यानंतर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास राहूल सपकाळे हा चेतन कोळी याच्या घराजवळ आला. व मोठ्यामोठ्याने शिवीगाळ तसेच आरडाओरड करायला लागला. चेतन चा भाऊ संदीप कोळी याने त्याला शिवीगाळ का करतो, असे विचारले असता राहूल ने त्यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. संदीपचे वडील व भाऊ चेतन तसेच आई कल्पना कोळी ह्या घराबाहेर आल्या. यानंतर राहूलने रागाच्या भरात कल्पना कोळी यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. मारहाणीत कल्पना कोळी यांच्या डोक्यातून रक्तश्राव झाला. त्याच्या पतीसह मुलांनी तिला तातडीने गोदावरी हॉस्पिटला हलविले. याठिकाणी उपचारानंतर कल्पना कोळी यांनी गुरुवारी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन राहूल सपकाळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अमोल विसपुते करीत आहेत.


Protected Content

Play sound