पाळधी गावाला मिळणार प्रथमच सभापतीपदाची संधी
पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर पंचायत समितीच्या सभापतीपदी पाळधी येथील नीता कमलाकर पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
जामनेर येथील पंचायत समितीच्या सभापती रुपाली नवलसिंग पाटील यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. ना. गिरीश महाजन यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात सभापती पदासाठी प्रत्येकी दहा महिने असे तीन सभापती करणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. यात प्रथम संगीता पिठोडे यांना सभापती केले होते. त्यांचा कालवधी संपल्याने रुपाली नवलसिंग पाटील यांची वर्णी लागली होती. आता त्यांचाही कालावधी आता समाप्त झाला आहे. रुपाली पाटील यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ बी एन पाटील यांच्याकडे राजीनामा दिल्याने पुढील काळासाठी आता नीता पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
पाळधी गटातील पाळधी गावाला प्रथमच सभापती पद मिळणार असल्याने संपूर्ण गावामध्ये व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.