रावेर प्रतिनिधी । सातपुड्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्या लंगडाआंबा परिसरात वनाधिकारी व कर्मचारी आणि शिकार्यांमध्ये चकमक झाली असून यात गोळीबार करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की सातपुड़ा पर्वत रांगा मध्ये वसलेले लंगडाआंबा येथे काही अज्ञात लोकांकडून वनविभागाच्या दिशेने अचानक फायरिंग केली यात त्यांनी दहा राउंड फायर केले असून वन विभागाच्या अधिका-यांनी देखिल जबाबी फायरिंग केली असून यात त्यांनी सहा राउंड फायर केले आहे.या दोघांच्या धुमकचक्रात लंगडाआंबा झोन आरएफओ थोडक्यात बचावल्याची प्राथमिक माहिती आहे दोघांमध्ये एकूण 16 ते 17 राउंड फायर झाले आहे.वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी,एसआरपी प्लाटून लंगडाआंबाच्या दिशेने ताबडतोब रवाना झाल्याची देखिल माहिती आहे.फ़ायरिंग करणारे शिकारी असल्याचे संशय वन विभागा कडून व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००