जळगाव, प्रतिनिधी । राज्यातील कोरोणा च्या पार्श्वभूमिवर २३ मार्चपासून येथील लाडवंजारी मंगलकार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशनच्या वतीने शहरातील गोरगरीब व परप्रांतीय मजुरांना दोन वेळेचे जेवण मिळाव म्हणुन अन्नछत्र उभारण्यात आले आहे. अन्नछत्र उपक्रमाद्वारे आतापर्यंत एक लाख ४० हजार गरजुंची भूक भागविली आहे.
दरम्यान, ३ मे रोजी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी लाडवंजारी मंगलकार्यालयात उभारण्यात आलेल्या अन्नछत्राला भेट देऊन नाथ फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना योग्य त्या काळजी घेऊन आपण हे कार्य उत्तमरीत्या पार पाडत असल्याने समाधान वाटले. वडीलधारी व्यक्ती म्हणुन तुमच्या सर्वांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आपणा सर्वांना भेटण्याकरता इथे आल्याचे सांगितले. तसेच स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात सूचना देखील दिल्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, सुनिल माळी, डॉ.अभिषेक ठाकुर, लोकेश मराठे, गणेश चौव्हाण, नितिन महाजन, धिरज काबरा, योगेश लाडवंजारी, रीतेश लाडवंजारी, मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी सचिन माळी, तलाठी रमेश वंजारी, मिलिंद लोणारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विविध भागात अन्नाचे पॉकिट घरपोच वाटप
अन्नछत्राच्या माध्यमातून गेल्या ४० दिवसांपासून शहरातील सुप्रीम कॉलनी, पंचशील नगर, खेडी, लक्ष्मीनगर, समतानगर, उजाड कुसुंबा, तट्याभील सोसायटी, पिंप्राळा, तांबापूर गवळी वाडा, शिवाजी नगर, इच्छादेवी नगर परीसरातील गोरगरिबांना रोज सकाळ-संध्याकाळी सुमारे २५०० ते ३००० अन्नाचे पॉकीट घरपोच वाटप करण्यात येत आहे. तसेच ४० दिवसांच्या कालावधीत हनुमान जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, अक्षय तृतीया सारख्या सणांच्या दिवशी गोड पदार्थ या पॉकीटमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
यांचे लाभले सहकार्य
नाथ फाउंडेशन, संत गोदडीवाले बाबा हरदास सेवा मंडळ, जैन इरिगेशन, शिवसह्याद्री प्रतिष्ठान नशिराबाद, रतनलाल सी. बाफना गोशाळा, हितेश प्लास्टिक जळगाव, साई संस्थान पाळधी, नव युवक अग्रवाल समाज मंडळ, माहेश्वरी समाज मित्र मंडळ, गिरीश पाल, स्वामी समर्थ सेवा मंडळ, नशिराबाद, प्रेमराज कलंत्री, समस्त लाडवंजारी मंगल कार्यालय व जळगाव शहरातील दानशूर मंडळींच या मदतकार्यास सहकार्य लाभत आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीला नाथ फाउंडेशनतर्फे चौकाचौकांवर बंदोबस्ताकरीता असलेल्या पोलिसांना व रस्त्यावरील गोरगरीब लोकांना बिस्लेरी पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले. तसेच शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये ८००० मास्कचे वाटप केले.