Home आरोग्य चिंताजनक : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८२८ वर; १०० जणांचा मृत्यू

चिंताजनक : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १८२८ वर; १०० जणांचा मृत्यू


पुणे वृत्तसंस्था । कोरोनाचे हॉ़टस्पॉट बनलेल्या पुणे शहरात कोरोनाने कहरच केला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज पुण्यात आणखी १३ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ८२८ वर पोहोचला आहे.

पुणे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजीच्या मध्यरात्री आणखी १३ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १८१५ वरुन १८२८ वर पोहोचला आहे. तर पुण्यात आतापर्यंत १०० जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे.


Protected Content

Play sound