भुसावळ प्रतिनिधी । वरणगाव फॅक्टरीच्या आवारात दरबान हॉस्पीटलजवळ एका कार मधून येवून हल्लेखोरांनी कामावरील दोन सुरक्षा रक्षकांवर मिरचीची पुड फेकून जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.
विनोद अहिरराव, शांताराम टी. जोहरे हे वरणगाव फॅक्टरीच्या हॉस्पीटलच्या मेन गेटजवळ रात्रपाळीसाठी ड्यूटी करत असतांना सकाळी ४ वाजेच्या सुमारास हतनूर धरणाकडून अज्ञात काळ्या रंगाची ओमनी कारमधून उतरत पाच हल्लेखोर आले व ‘आम्हाला फॅक्टरीत जायचे आहे’ असे सांगितले असता त्यावर ‘तुम्हाला आत प्रवेश दिला जाणार नाही’ असे सांगितले असता गाडीत काय ठेवले आहे? हे पाहण्यासाठी गेले असता हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांच्या डोळयांवर मिरचीपावडर टाकून हॉकी स्टीक बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला चढविला. त्यानंतर तेथून सर्व कारमधून फरार झाले. दरम्यान या हल्ल्यात दोघे सुरक्षा रक्षक दुखापती झाली असून दोघांना उपचारार्थ वरणगाव फॅक्टरीच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे सुरक्षा रक्षकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कारमध्ये दारूच्या बाटल्या, अवैधरित्या गुटखा आणि तंबाखू असल्याचे जखमी सुरक्षा रक्षकांनी सांगितले.
घटनास्थळी वरिष्ठांची भेट
घटनेची माहिती वरीष्ठ अधिकारी कर्नल अनिल मनकोटीया, कनिष्ठ कार्यप्रमुख एन.पी.वाघ, एल.पी. इंगळे, कामगार संघटनेचे पदाधिकारी योगेश सुर्यवंशी, योगेश ठाकरे, संतोष बारे, भानुदास सपकाळे, सुहास विभांडीक, कम्लेश सिंग, मनिष मोहल, गौतम सुरवाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून घटनेचा पंचनामा केला. अवैधधंद्यांची मुजोरी वाढली असून सुरक्षा रक्षासोबत पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.