भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत अवैध पध्दतीत हातभट्टी दारू विक्री करणार्या दोघांच्या विरोधात बाजारपेठ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भुसावळ शहरात पंचशील नगर जवळ च्या नाल्याचे बाजुला हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस पथकाने छापा टाकला असता शेख वसीम शेख चांद (रा.पंचशील नगर भुसावळ) हा मिळुन आला. तर नितीन उर्फ टक्कल मधुकर कांडेलकर (रा.कृष्णा नगर भुसावळ) असल्याचे माहित पडले. याप्रसंगी पोलीसांनी १० लिटर गावठी हातभट्टी आढळून आल्याने या दोघां विरुद्ध मुंबई प्रोव्हीशन अॅक्ट कलम-६५(ई) प्रमाणे कार्यवाही केली आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.रविंद्र बिह्राडे ,पो.कॉ.विकास सातदिवे,श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी केली आहे.