मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा तिढा सुटण्याचे संकेत

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा तिढा सुटण्याचे संकेत आता मिळाले आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त करण्यात यावे याबाबत राज्य मंत्रीमंडळाने दोनदा प्रस्तव पाठवूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना कॉल करून याबाबत चर्चा केली. कोरोना विरूध्दची आपत्ती सुरू असतांना राज्यपाल करत असलेल्या दिरंगाईबाबत ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे त्यांच्या आमदारकीचा प्रश्‍न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आज निर्णय जाहीर होऊ शकतो.

Protected Content