Home आरोग्य हलगर्जीपणामुळे प्रौढाचा मृत्यू झाल्याचा आरोप

हलगर्जीपणामुळे प्रौढाचा मृत्यू झाल्याचा आरोप

0
37

जळगाव प्रतिनिधी । वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रौढ इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रवींद्र भिका पाटील (वय ४६, रा.जैनाबाद) यांची प्रकृती बिघडल्यामुळे शनिवारी दुपारी कुटुंबियांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दुपारी २ वाजेपर्यंत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले. यानंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली होती. काही नातेवाईकांशी त्यांनी संवादही साधला. यानंतर डॉक्टरांनी त्यांना वॉर्ड क्रमांक ९ मध्ये शिफ्ट केले. काही वेळात त्यांची प्रकृती पुन्हा खराब होऊ लागली. अखेर ४.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पाटील यांचा मृत्यू झाल्यानंतर देखील पाऊन तास त्यांच्यावर उपचार करत असल्याचे भासवले. असा आरोप त्यांचा मुलगा स्वप्निल याने केला आहे. यामुळे मृत पाटील यांच्या कुटुंबियांनी डॉ.स्वप्निल कळसकर यांच्याविरूध्द तक्रार केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound