जळगाव प्रतिनिधी । आज पुन्हा एकदा भुसावळ शहरातील एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने शहरातील जनतेने काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखीत झाले आहे.
भुसावळ शहरातील समतानगर, पंचशील नगर, सिंधी कॉलनी आणि शांती नगर या भागातील रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आधीच दिसून आले आहे. यातील समतानगर व पंचशील नगरातील महिलांचा आधीच मृत्यू झालेला असून अन्य दोन्ही रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यातच आज रात्री आलेल्या रिपोर्टनुसार शहरातील अजून एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. हा रूग्ण सिंधी कॉलनी भागातील रहिवासी असून तो आधीच्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने बाधीत झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या रूग्णामुळे आता शहरातील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या सहा झाली असून यातील दोघे मयत झाले असून चौघांवर उपचार सुरू आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००