दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायले ; दोन तरुणांचा मृत्यू

सातारा (वृत्तसंस्था) लॉकडाऊनच्या काळात दारु न मिळाल्याने अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर पिल्याने सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

 

किरण सुरेश सावंत (वय 29) आणि दीपक रघू जाधव (वय 32) अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. हे दोघंही तरुण फलटण तालुक्यातील जिंती गावात दुसऱ्या जिल्ह्यातून आले होते. त्यामुळे या दोघांनाही आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केलेले होते. होम क्वारंटाईन केलेल्या या तरुणांनी दारु सदृश्य द्रव्य पदार्थाचे अर्थात सॅनिटायझरचे सेवन केले. अवघ्या काही वेळातच त्यांना त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Protected Content