जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनाचा प्रकोप वाढतांना दिसत असून आज तीन रूग्ण या विषाणून बाधीत असल्याचे आढळून आले असून यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांचा संख्या पाच झाली आहे.
कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यानंतर बरेच दिवस शहरासह तालुक्यात एकही रूग्ण आढळून न आल्याने बहुतांश नागरिक व प्रशासन निर्धास्त होते. मात्र यानंतर समता नगरातील महिला व पाठोपाठ सिंधी कॉलनीतील पुरूषाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आज शहरातील तीन रूग्णांचा कोरोना अहवाल हा पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रात्री उशीरा जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. आज आढळून आलेल्या बाधित रूग्णांपैकी दोन रूग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यातील एका रूग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रूग्णाचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. हे दोन्ही रूग्ण भुसावळ येथील आहे. भुसावळात आढळून आलेल्या तीन रूग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून एकावर उपचार सुरू आहेत. त्यातील एका रूग्णाचा तपासणीसाठी आणण्याअगोदरच मृत्यू झाला आहे. तर एका रूग्णाचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे.
हे तिन्ही रूग्ण समतानगर, पंचशीलनगर व शांतीनगर या भागातील आहेत. यामुळे रात्रीपासूनच हा परिसर सील करण्यास प्रारंभ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यातील समतानगर व पंचशील नगर या भागातील रूग्णांचा आधीच मृत्यू झाला असून शांती नगरातील रूग्णावर उपचार सुरू आहे. हे तिन्ही रूग्ण अनेकांच्या संपर्कात आले असून यामुळे परिसरात संसर्ग पसरला का ? याची खातरजमा आरोग्य यंत्रणा करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००