Home Cities अमळनेर जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी; अमळनेरच्या रूग्णाचा मृत्यू !

जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी; अमळनेरच्या रूग्णाचा मृत्यू !

0
62


जळगाव प्रतिनिधी । कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण वाढले असतांना या विषाणूने बाधीत असणार्‍या रूग्णांच्या बळीचा आकडा देखील वाढत चालला असून आज अमळनेरच्या बाधीत रूग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधीत बाधीत बळींची संख्या पाचवर पोहचली आहे.

अमळनेरील एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा रात्री उशीरा मृत्यू झाला असून याबाबत अद्याप प्रशासनाने अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. दरम्यान,
येथील कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रूग्णांमध्ये रविवारी अमळनेर येथील दोन रूग्णांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यात एका 17 वर्षीय तरूणाचा तर एका 44 वर्षाच्या पुरूषाचा समावेश असून हे दोन्ही रूग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कातील होते. ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८ आहे. यापैकी एक रूग्ण कोरोना मुक्त झाला आहे. तर आतापर्यंत ५ रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित रूग्णांवर कोरोना संसर्ग कक्षात उपचार सुरू आहे. मृत झालेल्या पाच जणांपैकी चार रूग्ण हे अमळनेरचे असून एक जळगावचा आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound