Home आरोग्य चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांच्या पलीकडे !

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांच्या पलीकडे !

0
82


मुंबई (वृत्तसंस्था) आज (सोमवार) हाती आलेल्या नव्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ८ हजारांच्या पलीकडे गेल्यामुळे राज्यातील परिस्थिती चिंताजनक झाली आहे.

 

मागील २४ तासांमध्ये राज्यात ४४० नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये मुंबईसह इतर काही हॉटस्पॉटमधील रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२६४ वर गेली आहे. त्यानुसार सध्याच्या घडीला राज्यात ८,०६८ कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात जवळपास ३४२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, ११८८ रुग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ८७२ जणांचा मृत्यू झाला आहे.


Protected Content

Play sound