Home क्राईम कालींका माता चौकाजवळ ट्रकने दुचाकीला उडविले; महिला ठार

कालींका माता चौकाजवळ ट्रकने दुचाकीला उडविले; महिला ठार

0
100

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कालिंका माता चौकाजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, रेहान बी शेख तस्लीम ह्या आपल्या पतीच्या दुचाकीच्या मागे बसून (एम.एच १९ बी.टी.९९७१) शहरात येत होत्या. कालिका माता मंदिराजवळ महामार्गावर ट्रकने या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर जागीच रेहानबी यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती व लहान मुलगीही या अपघातातून सुदैवाने बचावली आहे. संबंधीत महिला ही महापालिकेची कर्मचारी असल्याचे समजते. दरम्यान,या प्रकरणी ट्रकचालक फिरोज शहा याला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound