जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या सुधारित माहितीनुसार भुसावळ येथील एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्ण १८ तर भुसावळात दोन इतकी झाली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आज स्वॅब अहवालाबद्दल सुधारित माहिती देण्यात आली. यानुसार आज चार कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यातील तीन हे अमळनेर येथील तर एक हा भुसावळ येतील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कालच भुसावळात समतानगरातील महिला ही पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. या पाठोपाठ आज पुन्हा एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार संबंधीत रूग्ण हा शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील आहे. यामुळे समता नगरच्या पाठोपाठ आता सिंधी कॉलनी आणि परिसर देखील सील करण्यात येईल अशी शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००