जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील झिअम फाऊंडेशनतर्फे ग्रा.पं. सदस्य प्रदिप साळी यांनी आपला वाढदिवस साजरा न करता गोरगरीब दिव्यांग बांधव निराधार कुटुंबाना मोफत धान्य वाटप केले.
वाढदिवस अत्यंत नित्य व सामान्य गोष्टी आहेत त्यात स्वत:चा आनंद साजरा करण्यापेक्षा आपला सोबत सभोवतालच्या जगातले दु;ख दुर करणे त्याच्या संकट समस्याची सोडणुक करून वंचितांच्या जिवनात हास्य फुरवणे अशा विधायक आणि सकारात्मक संकल्पपुर्तीची सुरूवात असावी म्हणून गेल्यावर्षी साळी यांनी ७० माहीला कुंटुबाना मोफत ग्रँस कनेशन वाटप केले.
संध्या सुरू असलेल्या कोरोना जीवघेण्या आजाराची साथ त्यातून निर्माण झालेले भीतीचे वातावरण सामान्य जनतेच्या दैनदिनी जीवनावर होत असलेल्या विघातक परिणाम माझ्या मनाला अत्यंत वेदना देत आहेत. आपला गावातील असंख्य कुंटुब दोन वेळेच्या अन्नासाठी संघर्ष करीत आहे. अशा काळात नशिराबाद वार्ड क्रमांक ४ शिवसेना व झिअम फाँऊडेशन यांच्या माध्यमातून आम्ही सामान्य माणसाच्या जीवनाला आधार देण्याचा आणि शेवटच्या घटकापर्यँत जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.