Home आरोग्य कोरोना : आज नव्याने ४४ रूग्ण संशयित म्हणून दाखल

कोरोना : आज नव्याने ४४ रूग्ण संशयित म्हणून दाखल


जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज नव्याने ४४ रूग्ण संशयित कोरोना म्हणून दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात १८५ रूग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले त्यातील ४४ जणांना संशयित म्हणून दाखल केल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

१९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात कोविड-१९ संबंधित तपासणी करण्यातसाठी १८५ जणांची स्क्रिनिंग करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ रूग्ण पॉझिटीव्ह आले होते. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती बरी झाली आहे तर काल शनिवारी ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित म्हणून निष्पन्न झाले आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आजपर्यंत २९५ रूग्ण संशयित म्हणून दाखल होते. त्यातील २८१ जणांचे मेडीकल अहवाल निगेटीव्ह, ३ पॉझिटीव्ह, २ रिजेक्टटेड करण्यात आले तर १० जणांचे मेडीकल अहवाल येण्याचे बाकी आहेत.

कोरोना अहवाला निगेटीव्ह २८१ पैकी २१५ जणांना होम क्वॉरंटाईन म्हणून वैद्यकिय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ हजार ९४३ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


Protected Content

Play sound