Home धर्म-समाज रावेर तालुक्यात बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई; चौघांवर गुन्हा

रावेर तालुक्यात बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई; चौघांवर गुन्हा


रावेर प्रतिनिधी । तालुक्याच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी दारू बनवून व्रिकी करणाऱ्यांवर पोलीसांनी छापा टाकून हजारो लिटर कच्चे व पक्के रसायन नष्ट केले. याप्रकरणी चार जणांविरोधात रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विभागीय पोलीस अधिकारी गजानन पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मागदर्शनाखाली रावेर पोलीसांनी तालुक्यात अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू बनवून विक्री होत असल्याच्या ठिकाणी धडक कारवाई करत २२ हजार रूपये किंमतीची दारू व रसायन नष्ट केले आहे.

याप्रकरणी संशयित आरोपी बाबुराव देवचंद अटकाळे रा. थोरोला ता. रावेर याच्या ताब्यातून १२ हजार रूपयांचा मुद्देमाल, छगन दयाराम आटकाळे रा. थेरोळा ता.रावेर यांच्या ताबयातून १ हजार रूपये किंमतीची दारू, इंदुमती युवराज अटकाळे रा. थोरोळा यांच्या घरातून ७५० रूपये किंमतीची दारू आणि मुबारक महेबूब तडवी रा. खिरोदा ता. रावेर यांच्या घरातून ९०० रूपये किंमतीची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली. चौघांविरोधात रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनानुसार सपोनि कदम, पोहेकॉ अर्जुन सोनवणे, पोहेकॉ जितेंद्र नारेकर, पोहेकॉ सतीश सानप, पोहेकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ तुषार मोरे, पोकॉ मनोज मस्के, मपोकॉ नयना वडनेरे यांनी कारवाई केली आहे.


Protected Content

Play sound