Home धर्म-समाज आ.संजय सावकारे यांच्यातर्फे नाभिक समाजाच्या २०० कुटुंबांना धान्य वाटप

आ.संजय सावकारे यांच्यातर्फे नाभिक समाजाच्या २०० कुटुंबांना धान्य वाटप


भुसावळ प्रतिनिधी । देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नाभिक समाज बांधवांची दुकाने बंद असून आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आमदार संजय सावकारे यांनी दखल घेत तालुक्यातील २०० कुटुंबियांना धान्य वाटप करण्यात आले.

आमदार संजय सावकारे यांचा भुसावळ तालुक्यातील नागरिकांसाठी नेहमी मदतीसाठी पुढाकार असतो. नाभिक समाज बांधवांची दुकाने बंद असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने नाभिक संघाच्या अध्यक्षांनी आ.संजय सावकारे यांची भेट घेतली. कोरोनामुळे ज्या गरजू कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे, अशा नाभिक समाजाच्या २०० कुटुंबांना नाभिक संघातर्फे मा.आमदार संजय सावकारेतर्फे आज रोजी अशा कुटूंबाना १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेला बियाणी स्कुलमध्ये ३ कुटूंबाना बोलावून सोशल डिस्टनसींग ठेवून आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते धान्य वाटप करण्यात आले.तर बाकी धान्य नाभिक समाज बांधवांना घरोघरी जाऊन दिले.


Protected Content

Play sound