Home आरोग्य धक्कादायक : महाराष्ट्रातील आणखी १६५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह !

धक्कादायक : महाराष्ट्रातील आणखी १६५ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह !


मुंबईत (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे.

बुधवारी महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ९ मृत्यू झाले होते. शिवाय बुधवारी एकाच दिवशी २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले होते. गुरुवारी त्यात आणखी १६५ जणांची भर पडली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाहीय. दुसरीकडे मुंबईत दाट लोकवस्ती असलेल्या धारावीतील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गुरुवारी आणखी भर पडली. ११ जणांना करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीतील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ७१ वर पोहोचली आहे.


Protected Content

Play sound