पारोळ्यात सोशल डिस्टन्सिंगचा तीनतेरा; बँकांसमोर ग्राहकांची गर्दी

पारोळा प्रतिनिधी । शहरातील महाराष्ट्र बँक आणि जिल्हा बँक, स्टेट बँकेत जन-धन योजनेचा लाभ घेण्यासाठी आज बँकेच्या आवारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शहरातील सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहावयास दिसून आले.

याबाबत माहिती अशी की, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, संजय गांधी योजना, जन धन योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र बँक, स्टेट बँक, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखांमध्ये ग्राहकाची गर्दी करत आहे. मात्र महिला व पुरुष मास्कचा वापर न करता गर्दी करतांना आढळून आल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र कोरोना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बँकांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लाभार्थ्यांना बँकेत जाऊन ठराविक तारखांनाच ही रक्कम काढावी, यासाठी लाभाअर्थच्या बँके समोर मोठ्या रांगा लावून सोशल डिस्टन्सचे तीनतेरा वाजविले आहेत. आपली रक्कम बँकेत सुरक्षित आहे, असे बँकेने सांगण्यात आले आहे. बँकेत व्यवहार करताना सोशल डिस्टन्स राखावे, असे बँकेकडून आवाहनही करण्यात आले आहे.

Protected Content