Home Uncategorized पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू


औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमधील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

लक्ष्मण निवृत्ती कोरडे (30 वर्षे), सार्थक लक्ष्मण कोरडे (5 वर्षे), अलंकार रामनाथ कोरडे (15 वर्षे), वैभव रामनाथ कोरडे (10), समर्थ ज्ञानदेव कोरडे (10 वर्षे) अशी या मृतांची नावं आहेत. यात बाप-लेकासह दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. ही मुलं विवाह मांडावा येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. या घटनेनंतर आसपासच्या गावकऱ्यांनी मुलांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यात बाप-लेकासह दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. 4 मुलं आपल्या कुटुंबातील एका सदस्यासोबत पोहायला गेले होते. दरम्यान, देशभरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु असतांना ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound