लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीत नियमांचे तंतोतंत पालन करा- पालकमंत्री

जळगाव । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिल पर्यंत वाढविला असून या वाढीव मुदतीतही प्रशासकीय नियमांचे जिल्हा वासियांनी तंतोतंत पालन करण्याचे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

सध्या सुरू असणारा लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा आज सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेच्या नावने एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांच्या सहकार्याने कोरोनाचा यशस्वी प्रतिकार करण्यात येत आहेत. ही लढाई आपण सर्वांच्या मदतीने जिंकणारच असून आता यातील शेवटच्या टप्प्यात सर्वांना सावध राहण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात काही अपवाद वगळता जिल्ह्यातील जनतेने अतिशय संयमाने लॉकडाऊनचे पालन केले आहे. पुढील १५ दिवसांमध्येही याच प्रकारे नियमांचे तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला ”तुम्ही खबरदारी घ्या…आम्ही जबाबदारी घेतो” असे आश्‍वस्त केले आहे. याच प्रकारे जिल्ह्यातील जनतेची काळजी घेण्यासाठी माझ्यासह जिल्हा प्रशासन बांधील आहे. या कालावधीत आपली होणारी गैरसोय ही कमीत कमी कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांनी नियमांचे पालन केल्यास आपल्याला त्रास होणार नसल्याची ग्वाही आम्ही देत आहोत. मात्र लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीत नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर नियमानुसार कारवाई होईलच असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील गरजूंना प्रशासनासह खासगी संस्थात्मक पातळीवर योग्य नियोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीतही जिल्ह्यातील गरजूंना मदत केली जाणार असून पूर्वीप्रमाणेच शेतकरी हित जोपासले जाणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव या निवेदनात दिली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content