दिलासादायक : सांगलीत एकाच कुटुंबातील २५ रुग्ण कोरोनामुक्त

सांगली (वृत्तसंस्था) इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील कोरोनाबाधित २५ रुग्ण हे आता कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

सांगलीत २६ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे समोर आले होते. मात्र, त्यापैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या २२ रुग्णांच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्या होत्या. इस्लामपूरमधील या २५ रुग्णांपैकी २२ रुग्णांचे अहवाल आधीच निगेटिव्ह आले होते. त्यानंतर उर्वरित तीन जणांचे अहवाल नंतर आले होते. आता त्यांच्या संपर्कातील एक महिलाच कोरोनाबाधित आहे. तरी नियमाप्रमाणे यातील रुग्णांना काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.

Protected Content