पुढील ५ दिवस भुसावळात १०० टक्के संचारबंदी लागू करा ; डॉ.नीतू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्वीट

भुसावळ (प्रतिनिधी) पुढील पाच दिवस महत्वाचे आहेत. तसेच भुसावळ शहरात अजून एकही करोना बाधित रुग्ण सापडला नाही. तेव्हा पुढील ५ दिवस संपूर्ण शहर १०० टक्के संचारबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारींना द्यावेत, अशी मागणी डॉ.नी.तू.पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एका ट्वीटद्वारे केली आहे.

 

डॉ. पाटील यांनी ट्वीट केले आहे की, जय महाराष्ट्र, साहेब भुसावळ शहरात अजून एकही करोना बाधित रुग्ण सापडला नाही, तेव्हा पुढील 5 दिवस संपूर्ण शहर 100% संचारबंदी मार्केट, हॉस्पिटल, मेडिकल आदी सर्व सर्व बंद असे आदेश DM,SDM यांना द्यावे ही हात जोडून नम्र विनंती, जय महाराष्ट्र, असे म्हटले आहे.

 

तसेच भुसावळकरांना देखील डॉ. पाटील यांनी आवाहन केले आहे. या आवाहनात त्यांनी म्हटले आहे की, आजचा दैनिक तुम्ही वाचला असेलच, महाराष्ट्र करोना बाधित आघाडीवर आहे, ही बाब नक्कीच विचार करणारी आहे. काय काय काळाजी घ्यावी, काय करावे, काय करु नये हे सर्व सर्व तुम्हाला माहीतच आहे. आपल्याला साठी एकच बाब शुभ म्हणता येईल ती म्हणजे आजतागायत भुसावळ मध्ये एकही रुग्ण करोना पॉझेटिव्ह सापडला नाही, याचा अर्थ भुसावळ आणि भुसावळकर करोनापासून मुक्त आहे असा होत नाही…!

 

पुढील 5 दिवस हे सर्वांसाठी मोलाचे आहेत. मी त्याबद्दल मा. प्रांतधिकारी यांना व्हाटसअपद्वारे सर्व कळविले आहे. मी आत्ताच मा. मुख्यमंत्री श्री. ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यांना एक ट्वीट केले आहे. त्यात भुसावळकरांसाठी विनंती केली आहे. तुम्हा सर्वांना माझी हात जोडून नम्र निवेदन आहे की, आपण सर्वांनी असे Tweet करून त्यांना परिस्थिती अवगत करावी. भुसावळकरांनी भुसावळकरांच्या हितासाठी प्रत्येक भुसावळवासीयांनी केलेल असे हे ट्वीट असेल,जेणे करून शासन निर्णय घेण्यास अनुकूलता दर्शवेल. एक ट्वीट माझ्या भुसावळसाठी….!या अभियानात सहभागी व्हा, असेही डॉ. नि.तु. पाटील यांनी म्हटले आहे.

Protected Content