नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनामुळे मृत्यूंची संख्या १६६ वर पोहचलीय. चिंताजनक म्हणजे, यातील १७ मृत्यू मंगळवारी – बुधवारी झाल्याची नोंद झाल्याची, माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
आज सायंकाळच्या सुमारास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेऊन देशातील करोना फैलावाबद्दल माहिती दिली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत देशात १,३०,००० सॅम्पल्सची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील ५७३४ सॅम्पल्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. तसंच आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचली आहे. चिंताजनक म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत.