Home आरोग्य कोरोना : जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात नव्याने तीन संशयित रूग्ण दाखल

कोरोना : जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात नव्याने तीन संशयित रूग्ण दाखल


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात संशयित कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असून आज नव्याने सहा रूग्ण दाखल करण्यात आले आहे. तर ८६ जणांची स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली आहे.

कोरोनाचे पडसाद जळगाव जिल्ह्यात उमटायला लागले आहे. आज नव्याने ६ रूग्ण जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्तापर्यंत १७० जणांचे मेडीकल अहवाल निगेटिव्ह आला आहे. १८ जणांचे मेडीकल रिपोर्ट प्रतिक्षेत आहे. तर आत्तापर्यंत ११० जणांना होमक्वारन्टाईनवर सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत २९८८ जणांची ओपीडीच्या स्क्रिनद्वारे तपासणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात दोन जण कोरोना संक्रमित आढळून आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.


Protected Content

Play sound