Home धर्म-समाज भुसावळातील एनआरएमयुतर्फे कोरोना लढ्यात १ कोटी २ लाखांची मदत

भुसावळातील एनआरएमयुतर्फे कोरोना लढ्यात १ कोटी २ लाखांची मदत


भुसावळ प्रतिनिधी । देशात सुरु असलेल्‍या कोरोना आजाराशी लढा व लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्‍या नागरिकांच्‍या मदतीसाठी मध्‍य व कोकण रेल्‍वेतील रेल्‍वे कामगारांच्‍या सर्वात मोठ्‍या एनआरएमयु अर्थात नॅशनल रेल्‍वे मजदुर संघटनेतर्फे पंतप्रधान व मुख्‍यमंत्री सहाय्‍यता निधीसाठी प्रत्‍येकी ५१ लाख प्रमाणे एकुण १ कोटी २ लाख मदतीचे धनादेश देण्‍यात आले.

देशावर असोकी कामगारांवर आलेल्‍या कुठल्‍याही संकटात नेहमी एनआरएमयु संघटनेचा पुढाकार असतो त्‍यामुळे मध्‍य व कोकण रेल्‍वेचे महामंत्री वेणु पी.नायर यांनी युनियन सदस्‍यता शुल्‍कातून गोळा झालेल्‍या रकमेतुन हा निधी देण्‍यात आला. नॅशनल रेल्‍वे मजदुर युनियन या संघटनेने पुर्वी गुजरात भूकंप ५० लाख, केरळ पुरग्रस्‍तांसाठी १ कोटी, सांगली सातारा पुरग्रस्‍तांना १ कोटी रु.निधी दिल्‍याचेही महामंत्री वेणु पी.नायर यांनी सांगितले. यूनियनचे कार्यक्षेत्र मुंबई ते खंडवा, मुंबई ते बडनेरा,मुंबई ते मडगांव कोकण पर्यंत असल्‍याची माहिती भुसावळ विभागीय सचिव आर.आर.निकम यांनी दिली.


Protected Content

Play sound